Karnataka: accident : देव दर्शनातून परतताना एसयूव्ही -बसची धडक ,सहा जणांचा मृत्यू

1692153387 0284 Karnataka: accident : देव दर्शनातून परतताना एसयूव्ही -बसची धडक ,सहा जणांचा मृत्यू

कर्नाटकातील रामनगरा येथे वाहन आणि सरकारी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सथानूर शहराजवळील केम्मले गेट  येथे हा अपघात झाला. मृत हे एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते.

सर्व जण बंगळुरूच्या चांदपुरातील राहणारे असून चामराजनगर येथील माले महाडेश्वर मंदिरात दर्शन घेऊन ते परतत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोराची होती की सहा जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना रामनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काकूर झाला.नागेश, पुट्टाराजू, जोतिर्लिंगप्पा (कार मालक), गोविंदा आणि कुमार अशी सहा मृतांपैकी पाच जणांची नावे आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

बस चालकालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील इतर अनेक जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढले.