2021 मध्ये पेट्रोल 14 तर डिझेल 17 टक्क्यांनी महागले

नवी दिल्ली : आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष विविध कारणांनी गाजले मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ. 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला. इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तू  महाग झाल्या, या महागाईचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य मानसाला बसला. पेट्रालो आणि डिझेलच्या किमतीसोबतच गॅसच्या दर देखील समांतर वाढत राहिल्याचे पहायला मिळाले. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 14 टक्के दर डिझेलच्या दरात 17 टक्के वाढ झाली. लप

पेट्रोलचे दर  118 रुपये लिटरवर 

दोन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडाला होता. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 118 रुपये लिटरवर पोहोचले होते. तर डिझेलच्या किमतीने देखील शंभरी ओलांडली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये मोठा असंतोष पसरल्याचे पहायला मिळाले. अखेर चार नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्राप्रमाणेच काही राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी केल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचे पहायला मिळाले.

इंधनाचे दर आणखी वाढणार

2021 मध्ये पेट्रोलच्या किमती तब्बल 14 टक्क्यांनी वाढल्या तर डिझेलच्या किमतीमध्ये 17  टक्क्यांची वाढ झाली. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात तरी दरवाढीपासून दिलासा मिळणार का याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र नव्या वर्षात देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात तेजी काय राहण्याचा अंदाज आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणेज सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये कच्चे तेल प्रति बॅरल 90 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलावर अवलंबून असतात. येत्या वर्षात वर्षभर कच्च्या तेलाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्याने, पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *