पुणे पोलीस दलात खळबळ! महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

हायलाइट्स:

  • पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ
  • महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
  • आत्महत्येचं कारण अस्पष्ट. अधिक तपास सुरू

पुणे: शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण  यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी होत्या. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिल्पा चव्हाण या विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर येथे राहत होत्या. तिथंच त्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आज दुपारी ही घटना समोर आली. गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापूर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. काही महिन्यांआधी त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *