केवायसी अपडेटच्या बहाण्याने ऑनलाइन लिंक पाठवली, पुढं जे घडलं ते…

हायलाइट्स:

  • पुण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी
  • निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला घातला ४९ हजारांचा गंडा
  • कल्याणीनगरातील नागरिकाला ४ लाख ३५ हजारांना लुटले

 पुणे

बालेवाडी परिसरात निवृत्त सहायक पोलिस आयुक्त यांना सीमकार्डचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून ४९ हजार रुपयांची फसवणूक केली. तर, कल्याणीनगर परिसरात एका व्यक्तीला क्रेडिट कार्डचा ईमेल अपडेटच्या बहाण्याने चार लाख ३५ हजारांना गंडा घातला.

निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दिनकर शामराव महाजन (वय ६३) हे बालेवाडी परिसरात राहतात. त्यांना आरोपींनी फोन करून सीमकार्ड केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठविली. त्या लिंकवरून अॅप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर आलेला ओटीपी देखील त्यांना विचारून घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यामधून ४९ हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस तपास करत आहेत.

कल्याणीनगर परिसरात राहणारे मनोज अगरवाल (वय ५३) यांना एसबीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून चार लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे. आरोपींनी तक्रारदार यांना फोन केला. क्रेडीट कार्डचा ई-मेल आयडी अपडेट करायचा असल्याचे सांगून खात्याची माहिती घेतली. त्या क्रेडीट कार्डवरून ट्रीप डिलाईटचा चार लाख ३५ हजार रुपयांचा खर्च केला. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर अगरवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *