गवतावरून झालेला वादात थेट तलवारी, कुऱ्हाडाने मारहाण, औरंगाबादमध्ये खळबळ

औरंगाबाद : बटाईने केलेल्या शेतातील गवत आमच्या बांधावर का टाकतो एवढ्या शुल्लक कारणावरून झालेला वाद एवढा पेटला की, दोन गटात थेट लाठ्या-काठ्या आणि तलवार, कुऱ्हाडी हातात घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. ही घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील कागोनी शिवारात घडली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित कैलास ठोंबरे ( वय २४ ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी कागोनी शिवारात ते बटाईने घेतलेल्या शेतात ट्रॅक्टरने रोटर मारून शेतात जमा झालेला काडी कचरा व गवत वेचत असताना, सुरेंद्र गुलाब मोटे आणि कमाबाई सुरेंद्र मोटे यांनी सुमित ठोंबरे यांना, ‘तू बटाईने केलेल्या शेतातील गवत आमच्या बांधावर का टाकतो?, असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. वाद सुरू असतानाच सुमित ठोंबरे यांनी तलवार काढत सुमित यांच्यावर हल्ला केला. तर याचवेळी कमाबाई मोटे यांनी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सुनील बाळासाहेब थोरे यांच्या डोक्यात मारल्याने थोरे जखमी झाले आहेत.

परस्परविरोधी गुन्हे दाखल…

सुमित ठोंबरे यांच्या तक्रारीसोबतच सुरेंद्र गुलाब मोटे यांनी सुद्धा वैजापूर पोलीस ठाण्यात, आपल्याला सुनील बाळासाहेब थोरे, अनिल बाळासाहेब थोरे, कैलास दसरथ ठोंबरे, सुजित कैलास ठोंबरे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. माझ्यासह पत्नी आणि मुलाला वरील चार जणांनी हातातली काठ्याने मारहाण केल्याचा आरोप करत सुमित ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुद्धा वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गवळी तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *