बिटकॉइनचा भाव कोसळला; मागील तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर , हे आहे कारण

हायलाइट्स:

  • क्रिप्टो करन्सीच्या बाजारपेठेत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.
  • आज शुक्रवारी बिटकॉइनचा भाव ५ टक्क्यांनी गडगडला आणि तो ४१००० डॉलर खाली आला.
  • सप्टेंबर २०२१ नंतर त्यांनी हा नीचांकी स्तर गाठला.

मुंबई : फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि करोनाच्या तिसऱ्या लाटेने युरोपात घातलेल्या धुमाकूळ यामुळे क्रिप्टो करन्सीच्या बाजारपेठेत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. आज शुक्रवारी बिटकॉइनचा भाव ५ टक्क्यांनी गडगडला आणि तो ४१००० डॉलर खाली आला. सप्टेंबर २०२१ नंतर त्यांनी हा नीचांकी स्तर गाठला.आज बिटकॉइनमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्याचा भाव ४०९३८ डॉलरपर्यंत खाली घसरला. २९ सप्टेंबर २०२१ नंतर हा कमी दर आहे. तर नोव्हेंबरमध्ये बिटकॉइनने ६९००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. तेव्हापासून त्यात ४० टक्के घसरण झाली आहे.कॉइनमार्केटकॅपनुसार बिटकॉइनचा सध्याचा भाव ४१६६४.०४ डॉलर आहे. त्यात ३.२५ टक्क्यांची घट झाली. मागील सात दिवसात बिटकॉइनचा भाव १३.२१ टक्क्यांनी कमी झाला आहे.

दुसरे लोकप्रिय आभासी चलन असलेल्या इथेरियमला देखील आज नफावसुलीचा फटका बसला. इथेरियमचा भाव ६.०३ टक्के घसरण झाली. एक इथेरियम कॉइनचा भाव ३१८३.१२ डॉलर आहे. मागील ७ दिवसांत इथेरियमचा भाव १६.०७ टक्क्यांनी कोसळला आहे.

बिनान्स कॉईनच्या किमतीत ४.३६ टक्के घट झाली असून त्याचा भाव ४४६.५६ डॉलर आहे. तिथेर ०.९९ डॉलर आहे. सोलानाच्या किंमतीत मागील २४ तासात ६.७१ टक्के घसरण झाली. सोलाना कॉइनचा भाव १३८.७० डाॅलर इतका झाला. कार्डानोमध्ये ०.५५ टक्के घसरण झाली असून एका कार्डानोचा भाव १.२२ डॉलर इतका आहे. मात्र मागील आठ दिवसात कार्डानोचा भाव १०.२५ टक्क्यांनी कमी झाला आहे.

एक्सआरपीचा भाव ०.७४ डाॅलर इतका असून त्यात १.१७ टक्के घसरण झाली. डोजेकाॅइनचा भाव ०.१५ डाॅलर आहे. पोलकाडाॅटचा भाव २५ डॉलर इतका आहे. त्यात ४.३८ टक्के घट झाली आहे. लिटेकाॅइनच्या किंमतीत २.२५ टक्के घसरण झाली आहे. लिटेकाॅइनचा भाव १३१.८७ डाॅलर आहे. एव्हलान्चे काॅइनचा भाव ८९.०२ डाॅलर असून त्यात ५.०१ टक्के घसरण झाली आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कोट्यवधी भारतीय क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *