धक्कादायक! सोशल मीडियावरून मैत्री, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, धमकी अन् मारहाण

हायलाइट्स:

  • सोशल मीडियाद्वारे मैत्री, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
  • रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना
  • पीडितेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपीला केली अटक
  • लग्नाच्या भूलथापा देऊन चार महिन्यांपासून सुरू होते अत्याचार

 

मुंबई: सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंत तरूणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुली आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना सध्या घडत आहेत. असाच एक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीशी तरूणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवली. त्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्रीसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. चार महिन्यांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. हा तरूण तिला धमकावत होता. तसेच मारहाणही करत होता, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसा, राजीवडा येथील २० वर्षीय तरूणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि तरूणाची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तरूणाने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. सप्टेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाणही केली होती. या प्रकरणी पीडितेने गुरुवारी, ६ जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *