सासरच्या जाचाला कंटाळून विविहितेने घेतला टोकाचा निर्णय

हायलाइट्स:

  • लातूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
  • विविहितेची गळफास लावून आत्महत्या
  • सासरच्या जाचाला कंटाळून घेतला निर्णय

लातुरः सासू- सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील ३२ वर्षीय विवाहितेने पळसाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सासू- सासरे छळ करत असल्याच्या कारणामुळं विवाहितेने हे कठोर पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील ३२ वर्षीय अनिता गुट्टे या महिलेला सासरा नामदेव गुट्टे आणि सासू हे मुलं घेऊन नवऱ्या सोबत मुंबईला राहायला जा म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर अनिताने सुभाष चाटे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *