प्रेमसंबध ठेवण्यासाठी दबाव, ठेकेदारच्या बळजबरीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

औरंगाबाद: जिल्ह्यातील वाळूज भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, कमलापूर येथे राहणारे व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांची पत्नी खाजगी कंपनीत काम करत होत्या. तर त्यांच्या शेजारी राहणारे ठेकेदार रामदास गायकवाड यांच्यासोबत पीडित महिलेची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत रामदास हा सविता यांना तु माझ्या सोबत प्रेमसंबध ठेव यासाठी दबाव आणत होता. रामदास गायकवाड हा सतत त्रास देत असल्याने मयत महिलेने पती व मावसभाऊ या दोघांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पतीकडून आपल्या पत्नीला त्रास देऊ नको म्हणून रामदास गायकवाडला समज देण्यात आली होती. दरम्यान रामदास गायकवाड याचा कुटुंबातील लोकांकडून रामदाससोबत तुझे प्रेम संबंध असल्याचे सांगून मयत महिलेला शिवीगाळ देण्यात येत होती.
सततच्या त्रासाला कंटाळून मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी तसेच महिलेने वाळूज परिसरातील एका खाजगी कंपनीत काम सुरू केले. पण रामदास गायकवाड याची पत्नी सविता गायकवाड ह्या मयत महिलेला, ‘तु कंपनीत न जाता माझ्या पतीसोबत फिरते’ असा संशय घेऊन मयत महिलेला सतत त्रास देत होत्या. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने ३० नोव्हेंबरला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण उपचारादरम्यान सविता मुळे यांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी रामदास यमाजी गायकवाड, सविता रामदास गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, राधे रामदास गायकवाड या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *