१५ सुवर्ण, २० रौप्य आणि २९ कांस्यपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची दमदार कामगिरी

आशियाई पॅरा गेम्सच्या गुणतालिकेत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत चीनने सर्वाधिक ३०० पदक जिंकली असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. यानंतर इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराणने आतापर्यंत एकूण ७३ पदके जिंकली आहेत, ज्यात २४ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदकांचा समावेश आहे. या यादीत जपान तिसऱ्या क्रमांकावर (२० सुवर्ण, २१ रौप्य आणि २८ कांस्य) आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या खात्यात ६३ पदके (२० सुवर्ण, १३ रौप्य आणि २१ कांस्य) जमा झाली आहेत. उजबेकिस्तान ५५ पदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. उजबेकिस्तानने १७ सुवर्ण, १७ रौप्य आणि २१ कांस्यपदक जिंकले आहे.