स्वीडनचे रॉकेट नॉर्वेच्या हद्दीत कोसळले

स्वीडन स्पेस कॉर्पोरेशनने उत्तर स्वीडनमधील स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेले संशोधन रॉकेट  खराब झाले आणि लगतच्या नॉर्वेत कोसळले. रॉकेट 1 हजार मीटर उंचीवरून 15 कि.मी. अंतरावरील नॉर्वेच्या सीमेतील पर्वतांमध्ये कोसळले. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण काय, ते शोधले जात आहे.

दुसरीकडे नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे म्हटले असून स्वीडनने या घटनेची औपचारिक माहिती देण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही, अशी टीका केली आहे.