सातारा जिल्ह्यातील खळे गावच्या छोट्याशा शिद्रुकवाडी गावातील एक कलाकार , “अभिनेत्री गौरी सावंत”

WhatsApp Image 2023 05 07 at 3.38.14 PM 1 सातारा जिल्ह्यातील खळे गावच्या छोट्याशा शिद्रुकवाडी गावातील एक कलाकार , "अभिनेत्री गौरी सावंत"

अहमदनगर ब्यूरो चीफ अफसर शेख : पुण्यातील INIFD कॉलेज मध्ये फॅशन डिझायनिंग चे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी मॉडेलिंग मध्ये पाधरपण केले . पहिल्याच मॉडेलिंगशो मध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका डायरेक्टरनी त्यांना ॲक्टिंग क्षेत्रामध्ये काम करण्याचा सल्ला दिला आणि संधीही दिली, अभिनेत्री गौरी या कायमच कलेत उत्तीर्ण होत्या . लहान पणा पासूनच त्यांना कविता करणे , मूर्ती तयार करणे , चित्र रेखाटने तसेच नवनवीन प्रकाचे ड्रेस डिझाईन करणे याची आवड होती . २०१६ मध्ये राज्यस्तरीय कविता आयोजित केली होती, पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला होता, त्यावेळी सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल आकुर्डी येथील सर्व शिक्षक, आणि मुख्याध्यापक दाभाडे सर यांनी अभिनंदन केले होते, कलेवर प्रेम असणारी ही अभिनेत्री छोट्या छोट्या रोल मधून पडद्यावर दिसू लागली . सुरवातीला मिळेल तो रोल केला पण कधीही मला लीड रोल हवा आहे,असा हट्ट धरला नाही, इंडस्ट्री मध्ये (god father) नसताना कोणाशीही ओळख नसताना , स्वतःची ओळख निर्माण करायला खूप वेळ आणि कष्ट लागले YouTube webseries पासून मराठी चित्रपटात मुख्य हिरोईन इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होताच , पण मराठा कुटूंबात जन्म घेऊन अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करणं हेही तितकच अवघड होते.

सुरुवातीला घरचे इंडस्ट्री मध्ये जाण्यासाठी विरोध करत होते परंतु माझ्या मधील कला आई वडिलांनी समजून घेतली आणि हळू हळू मला ॲक्टिंग करण्यास परवानगी दिली असं त्या सांगतात, सुरवातीला असेच एका ऑडिशन साठी पुण्यातील निघोजकर वाडा मंगल कार्यालयात एक सुरज सोनवणे यांची भेट झाली, त्यांनी कला शृंगार ग्रुप जॉईन करण्यास सांगितले, आणि डायरेक्टर संजय मागाडे (काका)सरांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन चार शॉर्ट फिल्म मध्ये संधी उपलब्ध झाली, डायरेक्टर संजय मागाडे (काका) यांच्या कडून बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली,आता पर्यंत त्यांना मिळालेले सर्व सक्सेस हे खरं तर माझ्या “आई वडिलांचे” कष्ट आहेत माझ्या सावली प्रमाणे ते माझ्या पाठीशी असतात त्या हे सांगताना विसरत नाहीत, आता पर्यंत अंधेरी वेस्ट,लग्नाचे वळू, मुक्ता अशा फिल्म मध्ये काम केले आहे, अनेक फिल्म व गाण्यासाठी Costume designer, makeup artist म्हणून काम केले आहे, स्वतः ॲक्टर, लेखक, गीतकार, डान्सर, अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहेत,आई वडिलांचा कष्टांची जाणीव ठेवणारी आणि इंडस्ट्री मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री गौरी सावंत … लवकरच लीड रोल मध्ये आपल्या भेटीला येत आहे,…
अभिनेत्री गौरी सावंत…….