मोबाईलवरुन आयपीएल क्रिकेटवर बेटींग (सट्टा) घेणारा ऑनलाईन मुद्देमालासह जेरबंद.

अहमदनगर ब्यूरो चीफ अफसर शेख

नेवासा : माळीचिंचोरा, ता. नेवासा येथे साजिद पठाण हा मोबाईल फोनवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन सट्टा खेळत व खेळवित आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संदीप पवार, सचिन आडबल, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
एक इसम उघडयावर बसुन त्याचे मोबाईल फोनवर काहीतरी खेळताना व वहीमध्ये आकडेमोड करताना दिसला पथकाची खात्री होताच त्यास जागीच पकडुन ताब्यात घेतले.सदर इसमाच्या हातातील वही व मोबाईलची पहाणी केली असता त्याचे मोबाईल फोनमध्ये आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावुन गेम खेळत असल्याचे दिसुन आल्याने त्यास हातातील वही व मोबाईल फोनसह ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 13,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनी ऍ़न्ड्रॉईड मोबाईल, रोख रक्कम व आकडेमोड केलेली वही जप्त केली. पुढील कायदेशिर कार्यवाही नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.