पाथर्डी : नवरात्रोत्सवात मोहटा देवीच्या दर्शनासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघातून जवळ जवळ एक लाख महिला भाविकांना घेऊन येण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. महिला भाविकांना लंके प्रतिष्ठानच्या वतीने वाहनाने मोफत दर्शनासाठी आणण्याची व्यवस्था दरवर्षी नवरात्र काळात केली जाते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी महिला संख्या वाढल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. या वर्षी सुमारे सव्वा लाख महिला भाविकांना मोफत दर्शन घडवण्यात आहे. महिला भाविकांना घेऊन दररोज 225 ट्रॅव्हल गडावर येणार आहेत.
गुरुवारी त्यांनी मोहटादेवी गड येथे येऊन पारनेर तालुक्यातून येणार्या वाहनांसाठी केलेल्या पार्किंग मैदानाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवाजी होळकर,अर्जुन धायतडक, रणजित बेळगे, भोरू म्हस्के, महादेव म्हस्के, संदीप पालवे, अविनाश फुंदे, हरिओम दहिफळे, नितीन पालवे, मोहन दहिफळे आदी उपस्थित होते.