“नमो शेतकरी योजना” शासन निर्णय (GR)! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

“नमो शेतकरी योजना” राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना केंद्रशासनाप्रमाणेच दोन हजार रुपये दर चार महिन्याला देण्याची घोषणा तब्बल दोन महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. म्हणजेच शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेचे 6,000 रु. व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रु. असे एकंदरीत वार्षिक 12,000 रु. मानधन मिळणार आहे.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana GR (शासन निर्णय)

याबाबत मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा राज्यशासनाकडून 30 मे 2023 रोजी घेण्यात आलेला होता. ज्यामध्ये नमो शेतकरी योजना व 1 रुपयात पिकविमा योजना या दोन्ही योजनेला मंजुरी देण्यात आली. शासनाकडून ही योजना घोषित करण्यात आली; परंतु यासंदर्भातील कोणताही शासन निर्णय (GR) शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नव्हता.

दिनांक 15 जून 2023 रोजी राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस देण्यात आलेली मंजुरी, त्याबद्दलचा शासन निर्णय, योजनेची कार्यपद्धती, पोर्टल, निधी वितरणाची कार्यपद्धती इत्यादीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

नमो शेतकरी योजना GR

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्यथा बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य शासनाच्या अनुदान योजनेची भर घालून ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

लाभार्थी पात्रता व निकष काय असतील ?

  • सदर योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येतील.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले व शासनाच्या निकषानुसार पात्र ठरलेले सर्व लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
  • याचप्रमाणे केंद्रशासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी लागू राहतील.
  • नव्याने नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना देखील पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करून लाभ मिळवता येईल.

योजनेची कार्यपद्धती

पीएम किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरित करत असताना लाभार्थी ठरलेले शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवर बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

 हे पण वाचा : खरीप ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, 2023 ई-पीक पाहणी करा; अन्यथा पीक विमा व अनुदान मिळणार नाही

हफ्ता केव्हा मिळेल ?

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँकखात्यावर कृषी विभागामार्फत वितरित करण्यात येईल.

अ.क्र.हप्ता क्रमांककालावधीरक्कम
1पहिला हफ्तामाहे एप्रिल ते जुलैरु. 2,000/-
2दुसरा हफ्तामाहे ऑगस्ट ते नोव्हेंबररु. 2,000/-
3तिसरा हफ्तामाहे डिसेंबर ते मार्चरु. 2,000/-
नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा

बहुतांश शेतकरी योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून सदर योजनेचा लाभ आपल्याला केव्हा मिळेल?याची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आता शासन निर्णय आल्यानंतर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात येईल ही चांगलीच बाब आहे.

नमो शेतकरी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

नमो शेतकरी योजना राज्यात केव्हापासून राबविण्यात येत आहे ?

नमो शेतकरी योजना राज्यात 15 जून 2023 पासून राबविण्यात येत आहे.