नगर मध्ये विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापे. ४४,३२५ रु. मुद्देमाल जप्त.

नगर: नगर गावच्या शिवारात निसर्ग हॉटेल येथे बेकायदेशीर रित्या देशी व विदेशी दारुची मोठयाप्रमाणात विक्री चालू होती.

1683907238696366 1 नगर मध्ये विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापे. ४४,३२५ रु. मुद्देमाल जप्त.

सचिन अशोक भवर वय ३३ वर्षे रा. वाटेफळ ता. जि. अ.नगर विदेश दारुची विक्री करत होता. त्याच्याकडून एकूण ५१७५ रुपयेचा विविध कंपनीच्या देशी व विदेश दारुच्या बाटल्या मिळून आल्या.

दुसऱ्या ठिकाणी रुईछत्तीसी गावामधील हॉटेल दिपाली येथे सोमनाथ सुनिल जगदाळे वय २३ वर्षे रा. रुईछत्तीसी ता. जि. अ.नगर देशी व विदेशी दारुची विक्री करत होता. त्याच्याकडून एकुण ४६५०/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

तिसऱ्या ठिकाणी निमगांव वाघा गावच्या शिवारात एका घराच्या आडोशाला एक गावठी हातभट्टीचे रसायण व तयार हातभट्टीच्या एकुण ३४५००/- मुद्देमाल असा एकुण ४४, ३२५/- जप्त करण्यात आला.

सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.