नगर : भिंगार छावणी परिषदेची निवडणूक ताकदीने लढणार : आ. संग्राम जगताप

नगर; भिंगार छावणी परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. ही निवडणूक आपण सर्वजण पूर्ण ताकदीने लढविणार असून सातही प्रभागात उमेदवार निवडून आणू, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. भिंगार छावणी परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आमदार संग्राम जगताप बोलत होते.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, कलिम शेख, संभाजी भिंगारदिवे, नाथाभाऊ राऊत, विशाल बेलपवार, कैलास मोहिते, जेव्हीअर भिंगारदिवे, मुस्सा सय्यद, सुरेश मेहतानी, मतीन ठाकरे आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, आपण जनतेची केलेल्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचे काम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावे. जनतेशी असलेले अतूट नाते घट्ट करावे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विकास व सामाजिक कामातून जनतेचा विश्वास संपादन करावा. त्या माध्यमातून जनता आपल्याबरोबर राहत असते. भिंगार शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
प्रास्ताविक भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले. तर आभार प्रा. माणिकराव विधाते यांनी मानले.