नंदुरबार : नवीन कारने शोरूममध्ये घेतला कामगाराचा जीव

नंदुरबार : शोरूममध्ये कार घ्यायला गेलेल्या एका कडून कारचा विचित्र अपघात होऊन शो रूममध्ये काम करणाऱ्या कामगाराचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात शोरुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नंदुरबार शहरात एका चारचाकी गाडीच्या शोरूम मध्ये चारचाकी बघण्यासाठी आलेल्या एका ग्राहकानं शोरूममध्येच गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. गाडी सुरु करतातच अनियंत्रित होऊन गाडी वेगानं पुढे जाऊन हा अपघात घडला. ग्राहकाकडून गाडी अनियंत्रित झाल्यामुळे वेगानं पुढे गेली आणि शोरूममध्ये सफाई करणाऱ्या कामगाराला चिरडले. या अपघातात सफाई कामगाराचा मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने गाडी चालविण्यासाठी गाडी सुरु केली आणि गाडीचा वेग वाढवल्यावर गाडी अनियंत्रित झाली आणि गाडीने समोरील गाडीला धडक दिली यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.