धोनीच नंबर-१ विकेटकिपर! हैदराबादविरुद्ध रचला विश्वविक्रम, क्विंटन डी कॉकलाही टाकलं मागं

हैदराबादच्या डावातील १३व्या षटकात धोनीने महेश तिक्ष्णाच्या हातात चेंडू सोपवला. या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्करामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू त्याच्या बॅटला लागून धोनीच्या हातात गेला. या झेलसह धोनीच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. धोनीने त्याच्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत २०८ झेल पकडले आहेत. याबाबतीत त्याने क्विंटन डी कॉकला मागे टाकले, ज्याच्या नावावर २०७ झेलची नोंद आहे.