देसाईगंज येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

देसाईगंज दि.15: ग्रामसभा ही लोकसभा व राज्यसभेची जणनी आहे व ती स्वयंभू आहे. शासन, प्रशासनाकडून ग्रामपातळीवर राबविण्यात येणारे एकूण  सर्व योजना पारदर्शक पणे राबविण्या करीता सक्षम ग्रामसभेची गरज आहे. अन्यथा ग्रामपंचायती मध्ये नियमबाह्यता व  गैरकारभार झाल्या वाचून राहणार नाही. अनेक गावातील ग्रामस्थांना ग्रामसभा महत्त्व कळलेच नाही. पाचवर्षातून एकदा मतदान केल्या नंतरविकास कामावर आम जनतेचा सहभाग रहात नव्हता पण 73 व्या घटना दुरूस्ती ने ग्रामसभेला व्यापक अधिकार दिले असून  गावहिताचा व गावाती समस्त ग्रामस्थाच्या समस्या,आपेक्षा,शाश्वत विकासाचा आराखड्याला प्रशासकीय मंजूरी ग्रामसभा देत असेल तर त्याला  कोणतेही शासन प्रशासन बदल  करु शकत नाही.असे असतांना सुध्दा ग्रामसभेचे महत्व न समजल्याने अनेक ग्रामस्थ गाव विकासापासून वंचित राहीले.जल,जमिन,जंगल,जनावरे,जनता  यांचे मुलभुत गरजा पुर्ण करुन गावातील शिक्षण, आरोग्य, जलसिंचन, शेती, बांधकाम ,रोजगार,

वीज या सरख्या 12 विभागातील,29 विषय व 81कामे  कलम 45 व संविधातील अनुसुची 11 नुसार ग्रामपंचायतीवर सोपलेले आहेत या बाबीकडे ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांना लक्ष देण्याची गरज आहे. गावाच्या हिताचे सर्वानुमत्ते निर्णय घेण्यासाठी ग्रमसभा या सक्षमपणे ग्रमस्थानी सभाशास्त्राप्रमाणे चालवाव्यात त्यासाठी सक्षम असा कायदा आहे.

 महीलांच्या,  वंचितांच्या,मागासवर्गीय,बालके,शोषित यांच्याउन्नतीकडे लक्ष द्यावे. गावागावातील ग्रामसभा मजबुत व सक्षम झाल्यास आदर्श गाव निर्माण करु शकतो, यासाठी ग्रामसभा प्रशिक्षणाची गरज आहे, असे मत देसाईगंज (वडसा ) येथे पद्मभुषण अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोघी जन आंदोलन न्यास तथा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य जनतेच्या हिता करीता अण्णा हजारेच्या आंदोलनातुन प्राप्त झालेले ग्रामसभा,दप्तर दिरंगाई,नागरीकाची सनद, माहितीचे अधिकार,रेशनिंग व्यवस्था,यावर नुकतेच देसाईगंज येथिल संत महाराज सभागृहात आयोजित एक दिवशीय कार्यशाळा तथा भव्य मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे केंद्रीय सरचिटणिस अशोकजी सब्बन यांनी व्यक्त केले.

                     कार्यशाळा तथा भव्य मार्गदर्शन शिबीराचे उदघाटन निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्ष स्थानी जेष्ट समाजसेवक देवाजी तोफा होते. कार्यक्रमाला  भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे  केंद्रीय उपाध्यक्ष से.नि.प्राचार्य बालाजी कोंपलवार , राज्य समिती विश्वस्त डॉ.शिवनाथ कुंभारे, इंजीनियरींग काॕलेजच्या प्राध्यापिका विशाखा सरणे ,जिल्हाध्यक्ष विजय खरवडे ,विठ्ठलजी बदखल, सुबोध दादा, मोतीलाल जेठानी,श्रीमती प्रभाताई ढोरे,पुंडलिक नागपूरकर,अर्पना राऊत, दिपक बारसागडे, रक्षित पोटवार,ग्रामसेवाधिकारी सुखदेवजी वेठे,पंडीतजी पुडके, यशवंत मडावी, बाळासाहेब सुखदेवे,चरणदास बोरकुटे, महीला अध्यक्ष ज्योतीताई कोमलवार,भाऊरावजी पञे, संतोषजी दुपारे ,नानाजी ठाकरे,रामकृष्ण सहारे,प्रभाकर सुर्यवंशी,धनपालजी कार,ञ्यंबक भजणे,क्रिष्णा झंजाळ, मनोज,म्हशाखेञी, दयाराम बन्सोड,रुपराज लांजेवार, सोमेश्वर नाकाडे, शामजी कुथे,सारंग बेहरे,आनंदराव दुपारे,सारीका कुर्जेकर,शालुताई धोटे,रेखाताई बुल्ले ,मिनाक्षी ढोंगे, स्नेहा दोनाडकर, भाग्यश्री सेलोकर, सुरेखा रहाटे,रत्नप्रभा ढोंगे, रामभाऊ कुर्जेकर,रामभाऊ धोटे, दादाजी खरकाटे ,संजय प्रधान, देवराव फाये, साधोजी राऊत, बबन शिलार,लक्षमणजी मांडवे, हरीजी पिल्लारे ,यशवंत बगमारे, गुणवंत सयाम,घनशाम ढोंगे,नानाजी खुणे,पुंडलीक नेवारे,रेखाताई रासेकर,श्रीहरी गायकवाड,भाऊराव बानबले,दिनकर भोयर,घनशाम मडावी,धर्मेन्द्र परीहार,अनिता पारधी,रत्नमाला सहारे, ज्योती धावडे,मिनाताई कराडे ,यादव खोब्रागडे,वामन सेलोटकर, दादाजी खरकाटे,माधुरी सुरपाम,,विठ्ठल ढोरे,राहुल मेश्राम,नकुल सहारे,लालाजी बुरले, भाष्कर चौधरी,जेंगठे,भगवान खोब्रागडे,भागवत मारगावे,शालुताई मैद,राहुल वासनिक,दिगांबर बुल्ले,चरणदास कवाडकर, ,जयप्रकाश हर्षे,कृष्णा काळबांधे, ठोंबरे,रविन्द्र दोनाडकर, रामकृष्ण धोटे,अहेरीच्या माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे,शुभम खरवडे,संगीता हर्षे,दिनेशजी कुर्जेकर,योगेन्द्र झंजाळ,कृष्णा धानफोले, उपस्थित होते.

                        स्वातंञ्या नंतर या देशाची जनता मालक झाली त्याच क्षणी लोकशाही देशात नांदु लागली. लोकशाहीचे दोन भाग पडले एक शासन व दुसरा प्रशासन शासनकर्ते जनतेतुन निवडुन दिलेले लोक प्रतिनिधी हे जनतेचे विश्वस्त आहेत तर मतदार राजा आहे. तेव्हा नागरीकाना नागरीकाची सनद कळायला हवी.व प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात त्याचे पालन झाले पाहीजे.दप्तर दिरंगाईच्या कायद्यामध्ये कार्यालयीन कामकाजात एका टेबल वरुन दुस-या टेबलवर फाईल सात दिवसात सरकणे गरजेचे आहे.यात दिरंगाई झाल्यास सबंधीत वरीष्ट अधिकारी कारणे दाखवा नोटीस बजावेल व य़ात दप्तर दिरंगाई करणा-या कर्मचारी,अधिकारी यांचेवर शास्तीच्या कार्यवाहीची तरतुद आहे. तेव्हा प्रत्येक नागरीकांना दप्तर दिरंगाई कायद्याची माहिती असायला हवी असे यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे  केंद्रीय उपाध्यक्ष से.नि.प्राचार्य बालाजी कोंपलवार म्हणाले. कार्यक्रमात पेसा ग्रामसभा,नागरीकाची सनद, सार्वजनिक रेशनिंग व्यवस्था यावर मान्यवराचे मार्गदर्शन झाले.

                           कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषाच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. सर्व उपस्थीतांचे स्वागतगीत व कथक डान्सने लक्ष वेधले. कोरेगाव येथील विविध आभुषणासहीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याची भजन दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी कुरखेडा येथील गुरुदेव भजन मंडळींनी अध्यात्मिक वातावरणची निर्मिती केली.कार्यक्रमात सामाजीक क्षेञात उलेखनीय महान कार्य करणाऱ्या आलापल्लीे येथील स्वराज्य फाऊँडेशन यांचे सन्मानपञ व शिल्ड देऊन सन्मान करणात आले.तसेच इतर मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले

                      कार्यक्रमच्या यशस्वीतेकरीता स्ञी शक्ती संघटना वघाळा,आरमोरी, वासाऴा,जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय नैनपुर, निखीलेश्वर भजन मंडऴ सावंगी, अखिल भारतीयश्री गुरुदेव सेवा मंडळ, टायगर ग्रुप वडसा, तथा विविध सामाजीक संघटनेनी सहकार्य केलं.  कार्यक्रमाचे सुञसंचालन अहेरी येथील राजे धर्मराव विद्यालयाचे हायस्कुलचे शिक्षक रविन्द्र ठाकरे यांनी केले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तर आभार धनपाल कार यांनी मानले.या प्रसंगी संगीत शिक्षक धनपाल कार याचा वाढदिवस सपत्नी साजरा करण्यात आला