तिलक वर्मा उद्याचा युवराज, त्याला टीम इंडियात संधी द्या, चाहत्यांची सोशल मीडियावर मागणी

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने सलग दोन सामने जिंकत स्पर्धेत लय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित शर्मा, इशान किशन, अर्जुन तेंडुलकर आणि तिलक वर्मा या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळं आता मुंबईच्या सर्व खेळाडूंचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. परंतु आता तिलक वर्मा हा सातत्याने मुंबईसाठी चांगली फलंदाजी करत असल्यामुळं त्याचा भारतीय संघात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसह अन्य संघाच्या चाहत्यांनीही ट्वीटरवर ट्रेंड चालवत तिलक वर्माला टीम इंडियात संधी देत आगामी एकदिवसीय विश्वचषकात स्थान देण्याची मागणी केली आहे.