ता.पारनेर कुरुंद येथील बहुचर्चीत खुनाचे दोन मुख्य आरोपी २४ तासाचे आत अटक…!

पारनेर : ता.पारनेर कुरुंद १२ तारखेला दु. १२.३० च्या सुमारास आरोपी मनोज भिकाजी उबाळे व सखाराम भिकाजी उबाळे यांनी सुखदेव जयवंत उबाळे वय ६५ वर्ष व उषा सुखदेव उबाळे वय ५५ वर्ष यांचेवर धारदार कोयत्याने सपासप वार केले. तर आरोपी मनोज भिकाजी उबाळे व सखाराम भिकाजी उबाळे यांचे काका व मावशी दो. रा. करडे ता. शिरूर जि.पुणे यांनी फिर्यादी यांचे आई वडील यांना शिवीगाळ केली. झालेल्या मारहानी मध्ये सुखदेव जयवंत उबाळे वय ६५ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर उषा सुखदेव उबाळे हा गंभीर जखमी बाबत पारनेर पोलीस स्टेशनला फिर्यादी विक्रम सुखदेव उबाळे वय ३२ वर्ष रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४३५/२०२३ भा.द.वि कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारणेर ता.पारनेर कुरुंद येथील बहुचर्चीत खुनाचे दोन मुख्य आरोपी २४ तासाचे आत अटक...!

सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खरे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी न प्रा. वि. अ.नगर श्री अजित पाटील सो यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे पारनेर पो. स्टेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड व पथक यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे दोन पथक नियुक्त केले. पथकाने घटनेच्या अनुषंधाने गोपनीय माहीती संकलीत करून तपास पथकांना योग्य त्या सुचना दिल्या दोन्ही पथकांनी आरोपीतांच्या मागावर राहुन गुन्हयातील मुख्य दोन आरोपी १. मनोज भिकाजी उबाळे वय २३ वर्ष व २. सखाराम भिकाजी उबाळे वय २६ वर्ष दो. रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहमदनगर यांना गुन्हा घडल्यापासून २४ तासाने आतमध्ये सापळा लावुन शिताफीने अटक करण्यात आली आहे. आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करण्यात आले असुन मा.न्यायालयाने आरोपीतांची दिनांक १७/०५/२०२३ रोजी पावती पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड हे स्वतः करत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे सारे, उप विभागीय पोलीस अधिकारी न.ग्रा.वि.अ. नगर श्री अजित पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांचे सुचनेप्रमाणे, सपोनि / प्रमोद वाघ, पोसई एस. डी. जावळे, पाहेको/गणेश उहाले पोना/गहिनीनाथ यादव, पोना/सुधीर खाडे, पोना/गोरख गायकवाड, पोकों/सागर धुमाळ, पोकों/सारंग वाघ, पोक/विवेक दळवी, पोकों/ सत्यम शिंदे, पोकों/देविदास अकोलकर, पोकों/मपुर तोरडमल, पोकों/सुरज कदम सर्व नेम पारनेर पोस्टे तसेच पोकों/नितीन शिंदे, मोना / ज्योती काळे, मपोको माडेकर सर्व नेम दक्षिण विभाग मोबाईल सेल अहमदनगर यांचे पथकाने केली आहे.

हेही वाचा : श्रीरामपूर: गावठी कट्टे विकणारे टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखाची कारवाई.