‘….तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं’, सुप्रीम कोर्टाचं सर्वात महत्वाच भाष्य

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज समोर आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून निकालाचं वाचन करण्यात आलंय. यावेळी सरन्यायाधीशांनी संबंधित प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. नबाम रेबिया प्रकरणात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यामुळे हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवर कडक ताशेरे ओढले. राज्यपालांनी बोलावलेली बहुमत चाचणी ही चुकीची होती, असं स्पष्ट मत निकालात मांडण्यात आलं. यावेळी सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला.

Capture10 ‘….तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं’, सुप्रीम कोर्टाचं सर्वात महत्वाच भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या सगळ्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांची तीच कृती चुकीची ठरल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे. “सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंचा राजीनामा परत घेऊ शकत नाही. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं”, असं मोठं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं.