जळगावच्या स्वयंघोषित डॉनला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

जळगाव :भाईगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी विठ्ठल पाटील याला चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे त्याला हात जोडून माफी मागायची वेळ त्या स्वयंघोषित डॉनवर आली.

विठ्ठल पाटील हा जळगाव शहरात असलेल्या अयोध्या नगरातील रहिवासी आहे. हा सारा प्रकार जळगावातील आकाशवाणी चौकात 16 मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडलाय. विठ्ठल पाटील याने आपल्या मित्राच्या बोलेरो गाडीच्या टपावर बसून भाईगिरी केली. आपण जळगाव शहराचे मन्या सुर्वे डॉन असल्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिसांनी मस्ती जिरवल्यानंतर विठ्ठल पाटीलने हात जोडून माफी मागितली.

हेही वाचा : अहमदनगर कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले परत.

समाजात दहशत निर्माण होईल, अशा पद्धतीचं कोणत्याही स्वरूपाचं कृत्य करू नये, असं आवाहन पोलिसांनी या घटनेच्या निमित्ताने नागरिकांना केलंय. जर कोणी दहशत निर्माण होईल असं कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय.