खरीप ई-पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, 2023 ई-पीक पाहणी करा; अन्यथा पीक विमा व अनुदान मिळणार नाही

दरवर्षी प्रमाणेच ई-पीक पाहणीला (E Peek Pahani) सुरुवात झालेली आहे. राज्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरीप 2023 च्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत. 1 जुलै 2023 पासून शेतकरी खरीप 2023 ई पीक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन अपडेट करण्यात आलेले आहे.

E Peek Pahani 2023 | ई-पीक पाहणी 2023

शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी आता कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या मोबाईलवर शेतकरी सहज व सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद करू शकतात. शेतकऱ्यांना खरीप पाहणी करण्यासाठी प्ले-स्टोअरवरून जुना एप्लीकेशन अपडेट करून घ्यावा लागेल किंवा त्याऐवजी जुना एप्लीकेशन काढून टाकून नवीन ई पीक पाहणी अँड्रॉइड एप्लीकेशन (e Peek pahani app) इन्स्टॉल करावा लागेल.

ई-पीक पाहणी नवीन ॲपयेथे क्लिक करून डाऊनलोड करा

15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील महसूल विभागामार्फत ई-पीक पाहणीची मोहीम सुरू करण्यात आली. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी पूर्ण करावी लागते. राज्यामध्ये सध्या1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यांची नोंदणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे दिवसेंदिवस ई पीक पाहणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

 हे पण वाचा : 1 रुपयात पीक विमा योजना 3 वर्षासाठी राबविण्यास मान्यता, पहा शासन निर्णय (GR)

प्रकल्प संपूर्ण नावई पीक पाहणी
राबविणार राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
लाभार्थी वर्गराज्यातील शेतकरी
उद्देशपिकांच नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावा
नोंदणी पद्धतॲपच्या सहाय्याने
अधिकृत ॲपE Peek Pahani App

ई-पीक पाहणी नवीन सुविधा

 • Geo Fencing सुविधा
 • शेतकरी ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता
 • किमान 10% तपासणी तलाठ्यांमार्फत
 • 48 तासात ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
 • किमान आधारभूत किंमत नोंदणी सुविधा
 • मिश्र पिकांमध्ये इतर 3 मुख्य पीक नोंदविण्याची सुविधा
 • संपूर्ण गावाची ई पीक पाहणी बघण्याची सुविधा
 • ॲपबाबत अभिप्राय रेटिंगची सुविधा
 • खाता अपडेट करण्याची सुविधा

ई-पीक पाहणी लिस्ट

तुमच्या गावातील ई पीक पाहणीची यादी (List) पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ई पीक पाहणी अँप असणं महत्त्वाचं आहे. ई-पीक पाहणी ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर बरेच पर्याय दिसतील. ई-पीक पाहणी लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला शेवटचा पर्याय ‘गावाचे खातेदारांची पीक पाहणी’ या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर संबंधित गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी दिसेल. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाहणी केलेली असेल, त्यांचं नाव व ज्यांनी पाहणी केलेली नसेल, त्यांचसुद्धा नाव दाखवलं जाईल.

E Peek Pahani Online Maharashtra

आपल्या शेतातील पिकांची, फळ झाडांची, पडीक जमिनीची, विहीर अथवा बोरवेलची नोंद आपल्या मोबाईल वरती करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. ईऑनलाईन नोंद (Registration) करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सुशिक्षित शेतकरी फक्त 5 मिनिटाच्या आत ई-पीक पाहणी मोबाईलवरून करू शकतात.

ई-पीक पाहणी नवीन ॲपयेथे क्लिक करून डाऊनलोड करा
 • मोबाईलवर ई-पीक पाहणी कशी करावी ?
 • ई-पीक पाहणी करताना पडीक जमीन नोंद कशी करावी?
 • ई-पीक पाहणी विहीर बोर नोंद कशी करावी ?
 • ई पीक पाहणी नोंदणी 2023
 • ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड

 हे पण वाचा : “नमो शेतकरी योजना” शासन निर्णय (GR)! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

ई पीक पाहणी म्हणजे काय ?

हा एक सर्वेक्षण ॲप असून याच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प शासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे.

ई पीक पाहणी कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.