ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन राज्य तसेच अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना शेवगाव येथील झालेले दंगलीचे सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

अहमदनगर : शेवगाव येथे उसळलेल्या दंगलीत काही लोकांची दुकाने जाळली, व्यवसायाचे नुकसान झाले आणि जे निष्पाप आहेत त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असून पोलिस रात्रीच्या वेळी लोकांच्या घरात घुसून निरपराध लोकांवर अत्याचार करत आहेत. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शेवगावचे पोलीस निरीक्षक पुजारी यांना तात्काळ निलंबित करून या संपूर्ण घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन राज्य कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी साहब व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील भाई मुजावर आणि अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी पुणे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख अहमदनगर शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सनाउल्ला खान (तांबटकर) उपस्थित होते.