आमदार ढसाढसा रडले म्हणाले ‘त्यांच्या’ हातून मरण्यापेक्षा मी जीवन संपवेल… धमकी आलेल्या आमदाराची प्रतिक्रिया…

नाशिक : राज्यातील खासदार, आमदार यांना धमकीचे सत्र सुरूच आहे. नुकतीच नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरुन धमकी आल्याचे समोर आले आहे. बाजार समितीत प्रचार विरोधात केल्याच्या रागातून हिरामण खोसकर यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे. दोन कोटी खर्च करून तुला निवडणुकीत पाडेल अशी धमकी देत तुला बघतो अशी धमकी दिल्याचे आमदार खोसकर यांनी म्हंटलं आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांनी धमकी दिल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी दिला आहे.

हिरामण खोसकर म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडीचे काम करण्याचे वरुण आदेश आले आहे. मी आमदार असल्याने मी प्रमुख आहे. त्यामुळे मला काम करावे लागणार आहे. याशिवाय देविदास पिंगळे माजी खासदार आहे त्यांचे काम मी आमदार नव्हतो तेव्हापासून करत आलो आहे.

मी माझं काम करतो आहे. शिवाजी चुंभळे आणि त्यांचा मुलगा अजिंक्य चुंभळे यांनी मला 10 वेळेस फोन केले आहे. मला धमक्या दिल्या. देविदास पिंगळे यांचे काम करू नको, त्यांच्या व्यासपिठावर जाऊ नको म्हणून सांगितले, नाहीतर पाहून घेईल असा फोन आला होता.