अहमदनगर विज वितरण कंपनी कडून परस्पर शट डाऊन केल्यामुळे सर्वसाधारण नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी साठी हाल.

कळविण्यात येते की, आज शनिवार दि.१३/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचेकडून महानगरपालिकेस कुठलीही पूर्वसूचना न देता परस्पर त्यांचे दुरूस्ती कामासाठी शहर पाणीपुरवठा योजनेवर सकाळी १०.०० ते १२.३० वाजेपर्यत अचानक शट डाउन घेतला. 

त्यामुळे मुळानगर, विळद येथून शहरासाठी चा होणारा पाणी उपसा बंद पडलेला होता. सकाळी १०.०० ते १२.३० दरम्यान बंद पडलेला वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर मुळा नगर व विळद येथून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा सुरू करण्यात येत असून दुपारी १.०० वसंत टेकडी येथे पाणी येण्यास सुरुवात झाली व वसंत टेकडी येथे दुपारी ३.०० वाजता पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू होणार आहे.

परिणामी पाणी वाटपाच्या वेळेत सलग पाच तास पाणी बंद पडल्याने दरम्यानच्या कालावधीत पाणी वाटप सुरू असलेल्या बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागाचे पाणी वाटप विस्कळीत झालेले असून या भागात उशिराने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.

तसेच रविवार दि.१४/०५/२०२३ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड) बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी इत्यादी भागास उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

तरी अचानक खंडित झालेल्या वीस पुरवठ्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसर करावा व महानगरपालिकेत सहकार्य करावे असे जाहीर आवाहन महानगरपालिका करीत आहे.

सोनाली अजय चितळे

 नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका