अहमदनगर दक्षिण लोकसभा कॉंग्रेसलाचं मिळणार -मंगल भुजबळ

अहमदनगर : येणाऱ्या लोकसभा ,विधानसभेच्या द्रुष्टीने अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या द्रुष्टीने तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात श्रीगोंदा तालुक्यापासून करण्यात आली .श्रीगोंदा तालुका कॉंग्रेस कमिटी मधील महिला कॉंग्रेस ,युवक कॉंग्रेस ,कॉंग्रेस ओबीसी विभाग , विध्यार्थी कॉंग्रेस व विविध सेल च्या गाव पातळीवरील बूथ कमिटयांचे संघटन मजबूत करण्यासाठी कॉंग्रेस जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे साहेब ,कॉंग्रेस ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ ,जिल्हा समन्वयक वाफारे साहेब ,ओबीसी जिल्हाअध्यक्ष संतोष लोंढे ,युवक जिल्हाअध्यक्ष स्मितल वाबळे,युवक प्रदेश सचिव प्रशांत ओगले यांच्या प्रमुख उपस्थितीमधे श्रीगोंदा तालुक्याची आढावा बैठक पार पडली .येणाऱ्या काळात अहमदनगर जिल्यातील कॉंग्रेस पक्ष संघटन वाढवून विधानसभा व लोकसभेला कॉंग्रेस चा झेंडा फडकविण्याचा ध्यास पदाधिकारी यांनी घेतला असून नगर दक्षिण लोकसभा कॉंग्रेस ला मिळावा व नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी उमेदवारी करावी म्हणून तसे लेखी निवेदनही कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले साहेबांना दिले आहे त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा नक्कीच कॉंग्रेसलाचं मिळणार व कॉंग्रेस मोठ्या मताधिक्यांनी विजयी होणार असल्याने सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटले .यावेळी तालुकाअध्यक्ष प्राध्यापक धर्मनाथ काकडे यांनी प्रस्तावीक केले . आभार प्रशांत ओगले यांनी मानले .यावेळी श्रीगोंदा तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अहमदनगर अफसर शेख